कोरोना कहर! जिल्ह्यात एकाच दिवसात 9 मृत्‍यू!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 1 एप्रिलला कोरोनाने कहरच केला. तब्बल 9 बळी घेतले आहेत. उपचारादरम्यान रायपूर (ता. बुलडाणा) येथील 75 वर्षीय पुरुष, भालेगाव ता. मलकापूर येथील 65 वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील 68 वर्षीय पुरुष, जळकी बाजार जि. औरंगाबाद येथील 55 वर्षीय महिला, खेर्डा ता. जळगाव जामोद येथील 80 वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 1 एप्रिलला कोरोनाने कहरच केला. तब्‍बल 9 बळी घेतले आहेत. उपचारादरम्यान रायपूर (ता. बुलडाणा) येथील 75 वर्षीय पुरुष, भालेगाव ता. मलकापूर येथील 65 वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील 68 वर्षीय पुरुष, जळकी बाजार जि. औरंगाबाद येथील 55 वर्षीय महिला, खेर्डा ता. जळगाव जामोद येथील 80 वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील 53 वर्षीय पुरुष, भोकरदन जि. जालना येथील 78 वर्षीय पुरुष, मोताळा येथील 58 वर्षीय पुरुष व जळगाव जामोद येथील 71 वर्षीय पुरुष रुग्‍णाचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात नव्या 710 बाधितांची भर पडली असून, 509 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5087 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4377 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 710 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 397 व रॅपीड टेस्टमधील 313 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 483 तर रॅपिड टेस्टमधील 3894 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 153, बुलडाणा तालुका : झरी 10, मातला 2, बिरसिंगपूर 1, म्हसला 2, धाड 1, भादोला 2, येळगाव 1, साखळी खुर्द 1, कोलवड 1, नांद्राकोळी 5, पाडळी 2, घाटनांद्रा 1, बोंदेगाव 1,  पिंपळगाव सराई 4, रायपूर 1,  सव 1, देऊळघाट 1,  डोंगरखंडाळा 1, डोमरूळ 3,   खामगाव शहर :99 , खामगाव तालुका : मांडका 1,  जयपूर लांडे 1 , घाटपुरी 4, कलोरी 2, पिंपळगाव राजा 3, अंत्रज 1, सुटाळा 4, टेंभुर्णा 2, पिंप्री कोरडे 3, निरोड 1, आवार 1, आंबेटाकळी 1, शेगाव शहर : 5,  शेगाव तालुका : नागझरी 1,  मच्छींद्रखेड 1, वरखेड 1, जवळा 1,  जलंब 1, जळगाव जामोद शहर : 5, जळगाव जामोद तालुका : आलसगाव 3, तिवडी 1, जामोद 1,  संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, वकाणा 1, वरवट 1, चिखली शहर : 41,  चिखली तालुका : कोलारा 4, बेराळा 2, येवता 2, संजोळ 1,  बोरगाव काकडे 1, टाकरखेड 2, मेरा बुद्रूक 1, पळसखेड दौलत 2, पेठ 1,  रानअंत्री 1, ब्रह्मपुरी 2, करवंड 1, खंडाळा 1, अंचरवाडी 1, आंधई 1, शेलसूर 1,  पिंप्री आंधळे 1, आमखेड 3, सवणा 2, एकलारा 1, शेलूद 2, बोरगाव काकडे 1,  धोत्रा 3, भालगाव 1, एकलारा 3, गांगलगाव 1, भोरसा भोरसी 1, भरोसा 1, केळवद 1, मंगरूळ नवघरे 1, घानमोडी 1, वाघापूर 2, शेलगाव आटोळ 2,  मोताळा शहर : 5,  मोताळा तालुका :खामखेड 1, फर्दापूर 1, आडविहीर 1, आव्हा 3, जयपूर 1,  चिंचपूर 1, पिंपळगाव देवी 1, राजूर 1, पिंप्री गवळी 2, धामणगाव देशमुख 1,परडा 1, तरोडा 10, बोराखेडी 1, सांगळद 1, तपोवन 1, धामणगाव बढे 3, लोणघाट 3, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : बोरी 1, लोणी गवळी 1, डोणगाव 1, नांदुरा शहर : 15,  नांदुरा तालुका : टाकरखेड 1, दहीवडी 2, शेंबा 1, वडाळी 2,  गव्हाड 2, इसापूर 3, दादगाव 2, वडनेर 15, लोणवडी 1, शेलगाव मुकुंद 1, मलकापूर शहर : 37, मलकापूर तालुका : पिंपळखुटा 34, कुंड बुद्रूक 3, मोरखेड 1, विवरा 1, भालेगाव 2, झोडगा 1, दसरखेड 2, घिर्णी 1, माकनेर 1, दाताळा 1, धरणगाव 3, वडजी 1, भाडगणी 1,  देऊळगाव राजा शहर : 20,  देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 1, डोढ्रा 1,  सिनगाव जहाँगिर 1, सातेगाव 2, मेंडगाव 1, वाकी 1, देऊळगाव मही 4, टाकरखेड 4, सिंदखेड राजा शहर :9, सिंदखेड राजा तालुका : महारखेड 1,आंचली 1, वाघारी 1, शेलगाव राऊत 1, शेलगाव काकडे 1, साखरखेर्डा 2, शेंदुर्जन 2, बाळसमुद्र 1,  लोणार शहर : 7 , लोणार तालुका : बिबी 3, महारचिकना 3, पिंपळगाव अढाव 1, गणपूर 1,  खापरखेड 1,  कुंदेफळ 1, सुलतानपूर 1, अंजनी 1, गुंधा 3,  पिंपळगाव कोळ 1, पळसखेड 1, वढव 3, परजिल्हा जवळी बाजार जि. औरंगाबाद 1, पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन 1, औरंगाबाद 1,  बार्शी जि. सोलापूर 1, पाचोरा जि. जळगाव 1, वालसावंगी ता. भोकरदन 1, जामनेर जि. जळगाव 1, अकोला 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 710 रुग्ण आढळले आहेत.

5686 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

जिल्ह्यात कोविड निदानासाठी 3674 नमुने घेण्यात आले आहेत.  तसेच विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरमधून 509 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 223090 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 32499 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 223090 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 38454 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 32499 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रुग्णालयात 5686 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 269 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.