कोरोना काळात दुकान उघडल्याने कारवाई झालेल्या व्यापाऱ्याची आत्‍महत्‍या!; लॉकडाऊनच्‍या नैराश्याचा बळी?

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टुनकी (ता. संग्रामपूर) येथील कापड व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 11 जून रोजी दुपारी चारच्या सुमारास समोर आली. नैराश्य आल्याने आत्महत्या करत असून, कोणालाही यासाठी जबाबदार धरू नये, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. 23 मे रोजी या व्यापाऱ्याविरुद्ध निर्बंध काळातही दुकान उघडले म्हणून …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः टुनकी (ता. संग्रामपूर) येथील कापड व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहून विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना काल, 11 जून रोजी दुपारी चारच्‍या सुमारास समोर आली. नैराश्य आल्याने आत्‍महत्‍या करत असून, कोणालाही यासाठी जबाबदार धरू नये, असे सुसाईड नोटमध्ये म्‍हटले आहे. 23 मे रोजी या व्‍यापाऱ्याविरुद्ध निर्बंध काळातही दुकान उघडले म्‍हणून सोनाळा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला होता.

जुगलकिशोर जसराज चांडक (60) असे आत्‍महत्‍या केलेल्या व्‍यापाऱ्याचे नाव आहे. लॉकडाऊनचा हा बळी असल्याची चर्चा आहे. टुनकी बसथांब्‍यावर त्‍यांचे साई कलेक्‍शन नावाचे कापड दुकान आहे. टुनकीसह परिसरात हे दुकान प्रसिद्ध आहे. चार दिवसांपासून नैराश्यात असल्याची माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली. 20 जूनला त्‍यांच्‍या मुलाचे नागपूरला लग्‍न होणार आहे. काल दुपारी गाव शिवारातील विहिरीत उडी घेऊन त्‍यांनी आत्‍महत्‍या केली. त्‍यांना विवाहित मुली व एक मुलगा आहे. टुनकीत गेल्या 4 दिवसांत घडलेली ही दुसरी आत्‍महत्‍या आहे.