कोरोना : चिखलीच्‍या वृद्धाचा बळी; नवे 42 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 जूनला कोरोनाने चिखली येथील 80 वर्षीय पुरुषाचा बळी घेतला. दिवसभरात नवे 42 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 339 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4020 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3978 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, …
 
कोरोना : चिखलीच्‍या वृद्धाचा बळी; नवे 42 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 जूनला कोरोनाने चिखली येथील 80 वर्षीय पुरुषाचा बळी घेतला. दिवसभरात नवे 42 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले असून, 339 रुग्‍ण बरे झाल्‍याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4020 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3978 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 42 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 20 व रॅपिड टेस्टमधील 22 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 826 तर रॅपिड टेस्टमधील 3152 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर :3, बुलडाणा तालुका : अजिसपूर 1, कोलवड 4, मलकापूर शहर :1, मोताळा तालुका : पुन्हई 3, सिंदखेड राजा तालुका : चिंचोली 2, दोंडगाव 1, देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : कुंभारी 1, तुळजापूर 1, पांगरी 1, वाकड 1, किन्ही पवार 1, खामगाव शहर : 2, चिखली शहर : 2, चिखली तालुका : कोलारा 1, काटोडा 1, शेगाव शहर : 1, शेगाव तालुका : मनसगाव 1, संग्रामपूर शहर : 1, मेहकर तालुका : देऊळगाव साकर्षा 1, गोमेधर 1, चिंचोली बोरी 1, दुधा 1, मोसंबेवाडी 2, जळगाव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : सुनगाव 1, नांदुरा तालुका : निमगाव 1, चांदुरबिस्वा 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : परजिल्हा कारंजा ता. बाळापूर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 42 रुग्ण आढळले आहेत.

339 रुग्णांची कोरोनावर मात
आज 339 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 518383 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84719 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1294 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 518383 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 85825 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयांत 466 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 640 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.