कोरोना जाता जाईना… आणखी ५ रुग्‍णांची भर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काल, 15 ऑक्टोबरला कोरोनाचे नवे 5 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले, तर दिवसभरात 4 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 15 रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 515 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 510 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 5 …
 
कोरोना जाता जाईना… आणखी ५ रुग्‍णांची भर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काल, 15 ऑक्‍टोबरला कोरोनाचे नवे 5 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले, तर दिवसभरात 4 रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या 15 रुग्ण रुग्‍णालयांत उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 515 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 510 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 5 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 157 तर रॅपिड टेस्टमधील 353 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा तालुका : तांदुळवाडी 1, मलकापूर शहर : 1, देऊळगाव राजा शहर : 1, लोणार तालुका : शारा 1, सिंदखेड राजा तालुका : पोखरी 1

कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 87600 च्या घरात
आजपर्यंत 726160 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86911 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 382 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 726160 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87600 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 674 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.