कोरोना @ झिरो!; आजपर्यंत ८६ हजार ८९६ रुग्‍ण झाले बरे!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कोरोनाच्या विळख्यातून हळूहळू बुलडाणा जिल्ह्याची सुटका होताना दिसत आहे. आज एकही नव्या बाधिताची भर पडली नाही. सध्या 21 रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर अन् सुरक्षित अंतराचे पालन नियमित करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 654 अहवाल …
 
कोरोना @ झिरो!; आजपर्यंत ८६ हजार ८९६ रुग्‍ण झाले बरे!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कोरोनाच्‍या विळख्यातून हळूहळू बुलडाणा जिल्ह्याची सुटका होताना दिसत आहे. आज एकही नव्या बाधिताची भर पडली नाही. सध्या 21 रुग्‍ण रुग्‍णालयांत उपचार घेत आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर अन्‌ सुरक्षित अंतराचे पालन नियमित करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 654 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. सर्वच 654 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 164 तर रॅपिड टेस्टमधील 490 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 721813 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86896 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज 3 रुग्ण बरे झाले. आज रोजी 438 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87590 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.