कोरोना नियम झिडकारून वरात निघाली जोरात… पोलिसांनी वर-वधूसह माता-पित्‍यांविरुद्ध केला गुन्‍हा दाखल, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नसोहळ्यासाठी केवळ 50 जणांना उपस्थित राहण्याची अनुमती असताना काळेगाव (ता. खामगाव) येथे धूमधडाक्यात वरात निघाली. वरातीत 50 पेक्षा अधिक लोक सहभागी झाले. ही बाब पोलिसांनी पाहिल्याने वधू-वरासह त्यांच्या आई-वडिलांविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 12 एप्रिलला हा प्रकार समोर आला. काळेगाव येथील वसंता नथ्थुजी खंडारे यांच्या मुलीचा आरतीचा …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लग्‍नसोहळ्यासाठी केवळ 50 जणांना उपस्‍थित राहण्याची अनुमती असताना काळेगाव (ता. खामगाव) येथे धूमधडाक्‍यात वरात निघाली. वरातीत 50 पेक्षा अधिक लोक सहभागी झाले. ही बाब पोलिसांनी पाहिल्‍याने वधू-वरासह त्‍यांच्‍या आई-वडिलांविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. 12 एप्रिलला हा प्रकार समोर आला.

काळेगाव येथील वसंता नथ्थुजी खंडारे यांच्‍या मुलीचा आरतीचा काल विवाह सागवान येथील भीमराव तायडे यांच्‍याशी लागला. नवरदेवाच्‍या वरातीत 50 च्‍या वर लोक सहभागी झाले होते. त्‍यामुळे शासनाच्‍या नियमांचा भंग झाला. ही बाब पेट्रोलिंग करताना पिंपळगाव राजा पोलिसांना दिसली. त्‍यांनी वर भीमराव तायडे, वधू आरती खंडारे यांच्‍यासह वधूपिता वसंत खंडारे, वधूमाता निर्मळा खंडारे, वरपिता दिलीप तायडे व शीला तायडे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.