कोरोना नियम पाळण्याची यांना एवढी का जिवावर येते?; 59 जणांना दंड, बुलडाण्यात कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे जिल्ह्यातील जनजीवन पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात विस्कळीत झाले असतानाही अनेक जणांनी मात्र हलगर्जीपणाचा कळसच गाठला आहे. अशा 59 महाभागांवर काल, 23 मार्चला पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने बुलडाणा शहरात कारवाई केली. विशेष म्हणजे ठाणेदार प्रदीप साळुंखे कारवाईसाठी स्वतः रस्त्यावर उतरलेले दिसले. शहर पोलीस स्टेशनसमोर ठाणेदार प्रदीप साळुंखे कारवाई करत होते. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे जिल्ह्यातील जनजीवन पुन्‍हा एकदा प्रचंड प्रमाणात विस्‍कळीत झाले असतानाही अनेक जणांनी मात्र हलगर्जीपणाचा कळसच गाठला आहे. अशा 59 महाभागांवर काल, 23 मार्चला पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने बुलडाणा शहरात कारवाई केली. विशेष म्‍हणजे ठाणेदार प्रदीप साळुंखे कारवाईसाठी स्‍वतः रस्‍त्‍यावर उतरलेले दिसले.

शहर पोलीस स्टेशनसमोर ठाणेदार प्रदीप साळुंखे  कारवाई करत होते. जयस्तंभ चौकातही कारवाई मोहीम राबविण्यात आली. कोरोनाविषयक नियम न पाळणाऱ्यांसोबतच  विना परवाना, ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. 59 जणांकडून 14400 रुपये दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार श्री. साळुंखे यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलीस कर्मचारी विनोद गायकवाड, गजानन भंडारी, पंजाब पैठणे, नाजूकराव वानखेडे, विठ्ठल काळुसे व नगरपालिका पथकाने केली.