कोरोना प्रतिबंधासाठी नगरपालिका सरसावली! ‘सुपर स्प्रेडर’ची करणार कोरोना तपासणी

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुमारे 1 वर्षापासून कोरोना विरुद्धच्या युद्धात लढणारी बुलडाणा नगरपरिषद आता नव्याने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरसावली आहे! रोज शेकडो, हजारो नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या लहान- मोठ्या व्यावसायिक, वाहनचालक अर्थात ‘सुपर स्प्रेडर’ची कोरोना विषयक तपासणी करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सुमारे 1 वर्षापासून कोरोना विरुद्धच्या युद्धात लढणारी बुलडाणा नगरपरिषद आता नव्याने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरसावली आहे! रोज शेकडो, हजारो नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या लहान- मोठ्या व्यावसायिक, वाहनचालक अर्थात ‘सुपर स्प्रेडर’ची कोरोना विषयक तपासणी करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना केल्या. 17 फेब्रुवारीला जिल्ह्यात संचारबंदीसह विविध आदेश जारी करण्यात आले. त्यांच्याच मार्गदर्शनात मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी इतर उपाययोजनासह सुपर स्प्रेडरवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील लहान मध्यम व्यापारी, लघु व्यावसायिक, टपरीधारक, चहा स्टॉल धारक, ऑटो, ॲपे आदी प्रवासी वाहतूक करणारे चालक – वाहक, पानपट्टी चालक, भाजीपाला, फळ फळावळ, मांसाहारी पदार्थ विक्रेते आदींचा यात समावेश आहे. या सर्व घटकांशी मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उप मुख्याधिकारी स्वप्नील लघाणे बैठका घेणार आहेत. त्यात मोहिमेचा उद्देश, त्याचे लाभ आदींवर समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यांचे स्वॅब नमुने करून तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना वाढीला प्रतिबंध लागण्यास मदत होईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येते.