कोरोना महायोद्धा राजेश टोपे ठरले यंदाच्या मराठा विश्‍वभूषण पुरस्काराचे मानकरी!

लाखो भक्तांनी जिजाऊ जन्मोत्सव घरीच साजरा करण्याचे मराठा सेवा संघाचे आवाहन बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरत्या वर्षाला निरोप दिला की नवीन वर्षाबरोबरच महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजमाता जिजाऊंच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे 12 जानेवारीला आयोजित विश्वस्तरीय जन्मोसव सोहळ्याचे वेध लागतात आणि अखिल जगतात उत्सुकता लागते ती मराठा विश्वभूषण पुरस्काराचा यंदाचा मानकरी कोण ठरलाय? या प्रश्नाचे …
 

लाखो भक्तांनी जिजाऊ जन्मोत्सव घरीच साजरा करण्याचे मराठा सेवा संघाचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरत्या वर्षाला निरोप दिला की नवीन वर्षाबरोबरच महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजमाता जिजाऊंच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे 12 जानेवारीला आयोजित विश्‍वस्तरीय जन्मोसव सोहळ्याचे वेध लागतात आणि  अखिल जगतात उत्सुकता लागते ती मराठा विश्‍वभूषण पुरस्काराचा यंदाचा मानकरी कोण ठरलाय? या प्रश्‍नाचे उत्तर काल मिळाले असून, सन 2021 चा पुरस्कार कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणारे राज्याचे आरोग्यमंत्री शिवश्री डॉ. राजेश टोपे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

मराठा सेवा संघातर्फे दरवर्षी जिजाऊंच्या माहेरी व लाखो जिजाऊभक्तांच्या साक्षीने दिला जाणारा हा पुरस्कार  अत्यंत प्रतिष्ठेचा ठरला आहे. यंदा कोविडच्या पार्श्‍वभूमीवर व कोरोनाच्या सावटाखाली मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येणार्‍या जन्मोत्सव सोहळ्यात श्री. टोपे सहपरिवार हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. यावेळी मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा, अखिल मराठा विश्‍वाचे पंचप्राण शिवश्री अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर, पालकमंत्री राजेंद्र शिंगणे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 2020 च्या प्रारंभी धोक्याची चाहूल देत महाराष्ट्र देशात प्रवेश करून वर्षभर ठाण मांडून बसणार्‍या कोरोनाचे आव्हान पेलण्यासाठी एखाद्या निडर सेनापतीसारखे दोन हात करणार्‍या डॉ. टोपे यांनी आपल्या आरोग्य विभागरुपी फौजेच्या मदतीने मात केली. या महा कार्याची  दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जिजाऊ जन्मोत्सव सोहळा 2021  चे प्रसिद्धीप्रमुख शिवश्री विवेक काळे यांनी बुलडाणा लाईव्हला ही माहिती दिली.