कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजनाची सुविधा; शिवसेनेचा पुढाकार

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) ः कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला उपचाराकरिता रुग्णालयामध्ये घेऊन आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणासाठी होणारी परवड लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जोपासत बुलडाणा जिल्हा शिवसेनेने कोविड रुग्णालयाच्या परिसरातच मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना महामारी संकट सर्वत्र पसरले असून, त्याचा फैलाव ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अनेक कोरोना रुग्णांना त्यांचे नातेवाईक …
 

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) ः कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला उपचाराकरिता रुग्णालयामध्ये घेऊन आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणासाठी होणारी परवड  लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जोपासत बुलडाणा जिल्हा शिवसेनेने  कोविड रुग्णालयाच्या परिसरातच मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कोरोना महामारी संकट सर्वत्र पसरले असून, त्याचा फैलाव  ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अनेक कोरोना  रुग्णांना  त्यांचे नातेवाईक उपचाराकरिता बुलडाणा येथील जिल्हास्तरीय कोविड रुग्णालयामध्ये  आणत आहेत.  या ठिकाणी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची जेवणासाठी प्रचंड तारांबळ उडत आहे. कधीकधी उपाशी राहण्याची वेळ येते. कोरोना पेशंटसोबत आल्याने नातेवाईक व मित्रांकडे जाता येत नाही. नातलग डबे देऊ शकत नाहीत. दोन्ही रुग्णालये गावाबाहेर तर सर्वत्र लॉक डाउन असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांना कोविड सेंटरला भेट दिल्यावर आणि नातेवाईकांशी चर्चा केल्यावर ही बाब लक्षात आली. यावर जिल्हाप्रमुख बुधवत यांनी तात्काळ रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करून दिली आहे. या  सुविधेमुळे कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला आहे.