कोरोना रुग्‍णसंख्या साडेपाचशे!! 7 तालुक्यांतील तीव्रता कमी;तिघांचे मृत्यू

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः आठवड्याचा पहिला दिवस आजचा सोमवार (दि.17) जिल्ह्यासाठी काहीसा दिलासा घेऊन आलाय! गत् 24 तासांत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 550 पर्यंत घसरलाय! बुलडाण्यासह 6 तालुक्यांमधील रुग्णसंख्या नेहमीसारखीच असली तरी 7 तालुक्यांतील कोविडचा प्रकोप कमी झाल्याचे सुखद चित्र आहे. दुसरीकडे मृत्यूची संख्यादेखील 3 अशी मर्यादित राहिली आहे.गत् 24 तासांतील स्वॅब नमुने संकलन (4607)व …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः आठवड्याचा पहिला दिवस आजचा सोमवार (दि.17) जिल्ह्यासाठी काहीसा दिलासा घेऊन आलाय! गत्‌ 24 तासांत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 550 पर्यंत घसरलाय! बुलडाण्यासह 6 तालुक्यांमधील रुग्णसंख्या नेहमीसारखीच असली तरी 7 तालुक्यांतील कोविडचा प्रकोप कमी झाल्याचे सुखद चित्र आहे. दुसरीकडे मृत्यूची संख्यादेखील 3 अशी मर्यादित राहिली आहे.
गत्‌ 24 तासांतील स्वॅब नमुने संकलन (4607)व प्राप्त अहवाल ( 4727) कमी नसतानाही जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्‍णांची संख्या 550 वरच थांबली, हे विशेष. यातही बुलडाणा तालुक्याने नाबाद 115 ची तडाखेबंद खेळी केलीच! याशिवाय खामगाव 57, शेगाव 69, देऊळगाव राजा 49, मेहकर 52, लोणार 53 या तालुक्यांनी आपापला वाटा उचलला! मात्र चिखली 28, मलकापूर 3, नांदुरा 32, मोताळा 17, जळगाव जामोद 23, सिंदखेडराजा 21, संग्रामपूर 21 या तालुक्यांतील संख्या कमी आहे.
516 बळी
दरम्यान आजवरच्या काळात 526 मृत्यूची नोंद झाली आहे गत 24 तासात महिला रुग्णालय , लद्धड हॉस्पिटल बुलडाणा व सामान्य रुग्णालय खामगाव मध्ये प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे,