कोरोना लसीकरणादरम्‍यान निमखेडमध्ये उडाला गोंधळ; तहसीलदार, पोलीस आल्यावर ग्रामस्‍थ झाले शांत!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निमखेड (ता. देऊळगाव राजा) येथे कोरोना लसीकरणादरम्यान आज, १३ जुलैला गोंधळ उडाला. ओळखीच्या लोकांना टोकन दिले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अखेर तहसीलदार आणि पोलिसांनी येऊन ग्रामस्थांना शांत केले. सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत लसीकरण हाेणार होते. एकूण १३० लस देण्यात आल्या होत्या. मात्र यंत्रणेने …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः निमखेड (ता. देऊळगाव राजा) येथे कोरोना लसीकरणादरम्‍यान आज, १३ जुलैला गोंधळ उडाला. ओळखीच्‍या लोकांना टोकन दिले जात असल्याने ग्रामस्‍थांनी संताप व्‍यक्‍त केला. अखेर तहसीलदार आणि पोलिसांनी येऊन ग्रामस्‍थांना शांत केले.

सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत लसीकरण हाेणार होते. एकूण १३० लस देण्यात आल्या होत्या. मात्र यंत्रणेने कोणतेही नियोजन न केल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाला. नागरिकांना दिण्यात येणारे टोकण, वेळ नोंदणी यात तफावत दिसून येत असल्यामुळे ग्रामस्‍थांना मनस्ताप सहन करावा लागला. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना वेळेचे भान ठेवूनच लसीकरणासाठी यावे लागते. मात्र ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी ओळखीच्या लोकांना टोकण वाटप करत होते. त्‍यामुळे रांगेत उभ्या ग्रामस्‍थांनी गोंधळ घालायला सुरुवात केली होती. नियोजनशून्य कारभारामुळे अनेक ग्रामस्‍थ लसीपासून वंचित राहिले.