कोविड रुग्‍णालयांना पुरवा पोलीस संरक्षण!; जिल्ह्यातील या संघटनेने केली मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या कर्मचारी, डॉक्टरांना काही रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून शिविगाळ, अरेरावी, मारहाण असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कोविड सेंटरला पोलीस सुरक्षा पुरवा, अशी मागणी कोविड कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोलकुमार गवई यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, नांदुरा येथील वैद्यकीय अधिकारी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः कोरोना महामारीत स्‍वतःचा जीव धोक्‍यात घालून रुग्‍णसेवा करणाऱ्या कर्मचारी, डॉक्‍टरांना काही रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाइकांकडून शिविगाळ, अरेरावी, मारहाण असे प्रकार वाढले आहेत. त्‍यामुळे कोविड सेंटरला पोलीस सुरक्षा पुरवा, अशी मागणी कोविड कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोलकुमार गवई यांनी केली आहे. यासंदर्भात त्‍यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, नांदुरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बेंडे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. परिस्‍थिती हाताबाहेर जाण्याआधीच अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.