कोविड सेंटर्सची लूट चव्‍हाट्यावर!; 7 हॉस्पिटल्सनी रुग्‍णांना लुबाडले, 5 लाख रुपये जास्‍तीचे घेतले!

बुलडाणा (मनोज सांगळे, मो.9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःजिल्ह्यात कोविडबाधित रुग्ण किंवा नातेवाईकांना देण्यात आलेल्या बिलांच्या पडताळणीसाठी लेखा परीक्षकांची नियुक्ती प्रशासनाने केली होती. या लेखा परीक्षकांकडून त्यांना नेमून दिलेल्या रूग्णालयांना भेटी देण्यात आल्या. भेटीदरम्यान त्यांनी लेखा परीक्षण केले. त्यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील कोविडवर उपचाराची परवानगी असणाऱ्या एकूण 7 रुग्णालयांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून तब्बल 5 …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो.9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ःजिल्ह्यात कोविडबाधित रुग्ण किंवा नातेवाईकांना देण्यात आलेल्या बिलांच्‍या पडताळणीसाठी लेखा परीक्षकांची नियुक्ती प्रशासनाने केली होती. या लेखा परीक्षकांकडून त्यांना नेमून दिलेल्या रूग्णालयांना भेटी देण्यात आल्या. भेटीदरम्यान त्यांनी लेखा परीक्षण केले. त्‍यांच्‍याकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील कोविडवर उपचाराची परवानगी असणाऱ्या एकूण 7 रुग्‍णालयांनी रुग्ण आणि त्‍यांच्‍या नातेवाइकांकडून तब्‍बल 5 लक्ष 8 हजार 650 रुपये जास्तीचे घेतल्याचे समोर आले आहे.

कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर झालेल्या औषधोपचाराबाबत हॉस्पिटल्सनी आकारलेली बिले शासनमान्य दराप्रमाणे आहेत का, याबाबत लेखा परीक्षकांनी लेखा परीक्षण केले. त्यासाठी जिल्ह्यात रुग्णालयनिहाय लेखा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. लेखा परीक्षण अहवालात ज्या रुग्णालयांनी जास्तीची रक्कम रुग्णाकडून घेतली आहे, त्यांनी ही रक्कम संबंधितास परत देण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत. तशा प्रकारच्या सूचनादेखील उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लेखा परीक्षकांना नेमून देण्यात आलेल्या खासगी रूग्णालयांची यादी www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या बाबतचे कामकाज अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांचे मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी तथा नायब तहसीलदार विजय पाटील, अव्वल कारकून नितीन बढे यांनी केले आहे. यापुढे सुद्धा ज्या रुग्णांकडून रुग्णालयाने कोरोना औषधोपचाराबाबत जास्तीची रक्कम घेतली आहे त्‍यांनी लेखा परीक्षकांकडे तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हादंडाधिकारी यांच्‍यावतीने नायब तहसीलदार तथा या विषयाचे नोडल अधिकारी सुनील आहेर यांनी केले आहे.