कौतुकच… लोणार नगरपरिषदेने वसूल केले दीड कोटी रुपये!; रेकॉर्डब्रेक करवसुली

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः नगरपालिका प्रशासनाने करवसुलीसाठी यंदा कडक मोहीम राबवली. ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांच्या घरासमोर बँडबाजा वाजवला. नावे जाहीर केली. या सर्व प्रयत्नांतून तब्बल 1 कोटी 66 लाख रुपयांची करवसुली झाली आहे. 31 मार्चपर्यंत नागरिकांना करांचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. एकूण झालेली करवसुली उद्दिष्टाच्या 79.08 टक्के एवढी आहे. एक …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः नगरपालिका प्रशासनाने करवसुलीसाठी यंदा कडक मोहीम राबवली. ज्‍यांच्‍याकडे थकबाकी आहे त्‍यांच्‍या घरासमोर बँडबाजा वाजवला. नावे जाहीर केली. या सर्व प्रयत्‍नांतून तब्‍बल 1 कोटी 66 लाख रुपयांची करवसुली झाली आहे.

31 मार्चपर्यंत नागरिकांना करांचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. एकूण झालेली करवसुली उद्दिष्टाच्‍या 79.08 टक्‍के एवढी आहे. एक कोटी थकीत वसुली व 66 लाख चालू वसुली असे एक कोटी 66 लाख रुपये जमा करण्यात यश आले. मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी या कोरोना काळातही विविध उपाययोजना राबवून ही वसुली केली. जनतेने करांचा भरणा करावा म्हणून लकी ड्रॉचेही आयोजन केले. पूर्ण कर भरणाऱ्यांना लकी ड्रॉ मार्फत विविध पारितोषिकही देण्यात येणार आहे.  ज्या लोकांकडे थकित कर आहे त्यांच्या घरासमोर डफडे वाजवून कराचा भरणा करावा, अशी घोषणा माइकद्वारे करण्यात आले. त्यानंतरही कराचा भरणा न करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. या सर्व उपाययोजना अखेर फळाला आल्या, असेच म्‍हणावे लागेल.