खबरदार…वीज चोराल तर… सिंदखेड राजात 77 जणांविरुद्ध कारवाई

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वीजचोरांविरुद्ध महावितरण कंपनीने मोहीम उघडली असून, सिंदखेड राजा शहर आणि तालुक्यातील तब्बल 77 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 12 लाख रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे.मीटरमध्ये छेडछाड करणे, मेनलाइनवर आकडे टाकणे यामुळे कारवाई करण्यात आली. यात 6 वाईनबार आणि लॉज मालकांचाही समावेश आहे. वीजचोरांमुळे प्रामाणिक ग्राहकांना त्रास सोसावा …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वीजचोरांविरुद्ध महावितरण कंपनीने मोहीम उघडली असून, सिंदखेड राजा शहर आणि तालुक्यातील तब्बल 77 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 12 लाख रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे.
मीटरमध्ये छेडछाड करणे, मेनलाइनवर आकडे टाकणे यामुळे कारवाई करण्यात आली. यात 6 वाईनबार आणि लॉज मालकांचाही समावेश आहे. वीजचोरांमुळे प्रामाणिक ग्राहकांना त्रास सोसावा लागतो. रोहित्रावर लोड येऊन पंधरा पंधरा दिवस गावे अंधारात राहतात. त्यामुळे वीजचोरांबद्दल ग्रामस्थांनीच महावितरणला माहिती देण्याची गरज आहे. त्यांची नावे अर्थातच गोपनीय ठेवली जातात.