खरं खरं सांग तू किती चोऱ्या केल्यास… त्‍याने लिस्‍ट सांगायला सुरुवात केली अन्‌ पोलीस हैराण होत गेले…!; जानेफळ पोलिसांनी पकडला “सिरियल चोर!’

मेहकर (अनिल मंजूळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोपनीय माहिती मिळाली अन् जानेफळ पोलीस ठाण्याचे एक पथक तातडीने त्या २५ वर्षीय तरुणाच्या घराकडे रवाना झाले… घरात बरेच सामान दिसले…अर्थात ते चोरीचेच असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते… या पथकाने त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली तेव्हा त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने त्याला दरडावून विचारले, खरं खरं सांग …
 
खरं खरं सांग तू किती चोऱ्या केल्यास… त्‍याने लिस्‍ट सांगायला सुरुवात केली अन्‌ पोलीस हैराण होत गेले…!; जानेफळ पोलिसांनी पकडला “सिरियल चोर!’

मेहकर (अनिल मंजूळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोपनीय माहिती मिळाली अन्‌ जानेफळ पोलीस ठाण्याचे एक पथक तातडीने त्‍या २५ वर्षीय तरुणाच्‍या घराकडे रवाना झाले… घरात बरेच सामान दिसले…अर्थात ते चोरीचेच असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते… या पथकाने त्‍याला ताब्‍यात घेऊन विचारणा केली तेव्‍हा त्‍याने चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने त्‍याला दरडावून विचारले, खरं खरं सांग तू काय काय चाेरलेस आणि कुठे कुठे? मग काय घाबराघुबरा होता त्‍याने अख्खी लिस्‍टच सांगायला सुरुवात केली… त्‍याची लिस्‍ट वाढतच गेली… अन्‌ ती ऐकून पोलीसही हैराण होऊन त्‍याच्याकडे पाहत होते… त्‍याला गप्प करण्याची वेळ आली तरी त्‍याची लिस्‍ट काही संपत नव्हती… हा अचंबित करणारा प्रकार घडला तो जानेफळ पोलिसांसमोर. या २५ वर्षांच्‍या चोरट्याच्या ताब्‍यातून थोडाथोडका नव्‍हे तर तब्‍बल १ लाख ९७ हजार ७२ रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्‍त केला. गणेश पांडुरंग काटे (रा. जानेफळ) असे या अवलिया चोरट्याचे नाव आहे.

गेल्या काही दिवसांत जानेफळ हद्दीत वाढलेल्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी सहायक पोलीस निरिक्षक राहुल गोंधे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्‍यांनी एक स्वतंत्र पथकच तयार केले आहे. या पथकाला गणेश काटेबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. त्‍यांनी तातडीने जानेफळ येथील काटेचे घर गाठले. घरात चोरीच्या साहित्‍याचे मोठे घबाडच आढळले. त्‍याबद्दल त्‍याला विचारणा केली तर त्‍याने उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. मग पोलिसांनी सूर बदलला तेव्‍हा त्‍याने चोऱ्यांचा पाढाच वाचला. जानेफळ येथील बसस्‍थानकावरील ओम साई पानपट्टी फोडून त्‍याने सिगारेटचा माल घरात दडवून ठेवल्याचेही त्‍याने सांगितले. याशिवाय त्‍याच्‍या घरातून छोट्या मोठ्या अशा चोरीच्या ३१ वस्‍तू जप्त करण्यात आल्या. यात चक्‍की, मोटारपंप, इंजिन, मशिन्स, वजनकाटा, कुलर, गॅस सिलिंडर, स्‍प्रिंकलर, मोबाइल, शिलाई मशिन, केबल, फॅन, हातोडी, टॉमी यासह बऱ्याच साहित्‍याचा समावेश होता. विशेष म्‍हणजे त्‍याने रस्त्यावरचे फ्‍लेक्ससुद्धा सोडले नाहीत. त्‍याने ४ बॅनर चोरून आणलेले होते. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक तथा ठाणेदार राहुल गोंधे, पोलीस उपनिरिक्षक एस. डी. सावले, पोहेकाँ शरद बाठे, पोहेकाँ प्रल्हाद टकले, पोहेकाँ गणेश देढे, पो.ना. कैलास चतरकर, पोकाँ विनोद फुफाटे, पोकाँ राजेश गौंड, पोकाँ अनंता कमलकर, पोकाँ शेख इसाक, पोकाँ ज्ञानेश्वर शेळके, पोकाँ दिलीप जाधव, पोकाँ समाधान अरमाळ, महिला कर्मचारी नीता शिंदे, प्रशांत आरसडे यांनी पार पाडली.