खळद खुर्द येथे आग; 3 शेतकऱ्यांचे कृषि साहित्य भस्मसात, मदतीची अपेक्षा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः संग्रामपूर तालुक्यातील खळद खुर्द शिवारात आज, 13 एप्रिलला दुपारी अचानक लागलेल्या आगीत ३ शेतकऱ्यांचे ठिबक संच, स्प्रिंकल, नोझल, पाईप जळून खाक झाले. दुपारी शेतातील कामे आटोपून घरी परतले असता शेतात आग लागल्याचे शेतकऱ्यांना समजले. त्यांनी शेताकडे धाव घेतली. आग नियंत्रणात येण्यापूर्वीच तिघांचे साहित्य जळून खाक झाले. शेतकरी गजानन कुरवाळे यांचे २९ स्प्रिंकलर …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः  संग्रामपूर तालुक्यातील खळद खुर्द शिवारात आज, 13 एप्रिलला दुपारी अचानक लागलेल्या आगीत ३ शेतकऱ्यांचे ठिबक संच, स्प्रिंकल, नोझल, पाईप जळून खाक झाले.

दुपारी शेतातील कामे आटोपून घरी परतले असता शेतात आग लागल्याचे शेतकऱ्यांना समजले. त्‍यांनी शेताकडे धाव घेतली. आग नियंत्रणात येण्यापूर्वीच तिघांचे साहित्य जळून खाक झाले.  शेतकरी गजानन कुरवाळे यांचे २९ स्प्रिंकलर व २ नोजल असे एकूण १६ हजार रुपयाचे, प्रभुदास शिंदे यांचे स्प्रिंकलर पाईप मिळून ६ हजारांचे तर ओंकार कुरवाळे यांचे शेतातील ठिंबक सिंचन पूर्ण जळून १५ हजार रुपयांचे  मिळून तिन्ही शेतकऱ्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. तलाठी वसिम शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. आग कशाने लागली हे मात्र कळू शकले नाही. या तिघांनी शासकीय मदत मिळण्याची मागणी केली आहे.