खाकीतील ‘ती’…. जिल्ह्यात 343 महिला शक्‍तीच्‍या हाती कायदा-सुव्यवस्‍थेची धुरा…

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजघडीला महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. मोठ मोठ्या पदांवर त्या विराजमान होऊन घरासोबत सत्तासूत्रेही सांभाळत आहेत. पोलीस विभागातही महिला आपल्या कार्यकर्तृत्वाने आपला वेगळा ठसा उमटवत असून, जिल्ह्यातील कायदा ,सुव्यवस्था सांभाळण्यासाठी 343 महिला पोलीस विभागात कार्यरत आहेत. यात 1 पोलीस निरीक्षक, 2 एपीआय, 7 पीएसआय अशा 10 अधिकारी …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आजघडीला महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. मोठ मोठ्या पदांवर त्‍या विराजमान होऊन घरासोबत सत्तासूत्रेही सांभाळत आहेत. पोलीस विभागातही महिला आपल्या कार्यकर्तृत्‍वाने आपला वेगळा ठसा उमटवत असून, जिल्ह्यातील कायदा ,सुव्यवस्था सांभाळण्यासाठी 343 महिला पोलीस विभागात कार्यरत आहेत. यात 1 पोलीस निरीक्षक, 2 एपीआय, 7 पीएसआय अशा 10 अधिकारी सुद्धा आहेत तर 2 एएसआय, 29 हेड कॉन्स्टेबल, 95 नायब पोलीस कॉन्‍स्‍टेबल आणि 207 महिला पोलीस शिपायांचा समावेश आहे.
कुटूंबांची जबाबदारी, सासू- सासरे, पती, मूलबाळ, नातेवाईक सांभाळून या महिला पोलीस दलासाठी योगदान देत असतात. कोणत्या वेळी पोलीस ठाण्यातून फोन येईल आणि नोकरीवर हजर व्हावे लागेल याचा काहीही नेम नसल्याचे एका महिला पोलिसाने सांगितले. 24 तास सेवा देत असताना लेकराला खाऊ घालता येत नाही याचे दुःख नेहमीच असते. शिवाय सासू- सासऱ्यांना सुनेकडून असलेल्या अपेक्षा पाहिजे तेवढ्या पूर्ण करता येत नाहीत. अनेकदा समोर वाढलेले जेवणाचे ताट सुद्धा बाजूला करून नोकरीवर जावे लागते. अनेक महिला पोलिसांना कधीकधी चिमुकल्या बाळाला सोबत घेऊन ठाण्यात हजर व्हावे लागते. नोकरी करताना मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष देता येत नसल्याचे महिला पोलीस कर्मचारी सांगतात. फारशा सुट्या मिळत नसल्याने कौटुंबिक ओढाताण, सण- उत्सवामध्ये घरी गैरहजेरी यामुळे नातेवाईकांचा सुद्धा रोष सहन करावा लागतो.
सरकारकडून अपेक्षा…
बदली हा सर्वात कठीण शब्द असल्याचे एका महिला पोलिसाने सांगितले. दर 5 वर्षांनी पोलिसांच्या ठाण्यातून बदल्या होतात. अशा वेळी मुलांचे शिक्षण, पतीचा व्यवसाय आणि इतर सर्व कौटूंबिक व्यवस्था विस्कळीत होते. त्यामुळे एकदा एखाद्या ठाण्यात नोकरी सुरू केली तर किमान 10 वर्षे त्यात बदल करू नये, याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज महिला दिनानिमित्ताने त्‍यांनी व्यक्त केली.