खामगावच्या गो.से. महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनीचा विनयभंग

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गो.से. महाविद्यालय परिसरातील कॅन्टिनमधून मैत्रिणींसह बाहेर पडलेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीचा 26 वर्षीय तरुणाने विनयभंग केला. ही घटना 8 जानेवारीला घडली असून, काल तक्रार देण्यात आल्याने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आनंद मिलिंद खंडारे (रा. सुटाळा खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आनंदने तिला अडवून …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गो.से. महाविद्यालय परिसरातील कॅन्टिनमधून मैत्रिणींसह बाहेर पडलेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीचा 26 वर्षीय तरुणाने विनयभंग केला. ही घटना 8 जानेवारीला घडली असून, काल तक्रार देण्यात आल्याने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आनंद मिलिंद खंडारे (रा. सुटाळा खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आनंदने तिला अडवून वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. तपास पीएसआय रणजितसिंह ठाकूर करत आहेत.