खामगावच्या सरकारी गोदामातून 3 लाखांच्या तुरीवर डल्ला; भंडारपाल दीपिका खोडके यांनी दाखल केली तक्रार

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव एमआयडीसीतील सहयोग संकुल जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या गोडवूनमधून 3 लाख रुपयांची तूर चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना 22 ते 23 जानेवारीच्या रात्रीतून घडली.या प्रकरणी भंडारपाल दीपिका ज्ञानेश्वर खोडके यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी गोडावून फोडून शटरलॉकची पट्टी वाकवून 50 किलो वजनाचे …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव एमआयडीसीतील सहयोग संकुल जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या गोडवूनमधून 3 लाख रुपयांची तूर चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना 22 ते 23 जानेवारीच्या रात्रीतून घडली.
या प्रकरणी भंडारपाल दीपिका ज्ञानेश्‍वर खोडके यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी गोडावून फोडून शटरलॉकची पट्टी वाकवून 50 किलो वजनाचे 92 कट्टे 46 क्िंवटल तूर अंदाजे किंमत 2 लाख 93 हजार 480 चोरून नेली.