खामगावच्‍या भवानी पेट्रोलपंपावर राडा!; टोळक्‍याचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, चाकूचे वार, एक कर्मचारी जखमी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोल टाकल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आल्याने टोळक्याने पंपावरील कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. चाकूने वार केल्याने एक कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना खामगाव शहरातील शिवाजीनगर भागातील भवानी पेट्रोलपंपावर 26 जूनच्या रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका हल्लेखोराला कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवले होते, …
 
खामगावच्‍या भवानी पेट्रोलपंपावर राडा!; टोळक्‍याचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, चाकूचे वार, एक कर्मचारी जखमी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पेट्रोल टाकल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आल्याने टोळक्‍याने पंपावरील कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. चाकूने वार केल्याने एक कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना खामगाव शहरातील शिवाजीनगर भागातील भवानी पेट्रोलपंपावर 26 जूनच्‍या रात्री साडेआठच्‍या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. एका हल्लेखोराला कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवले होते, तर त्‍याचे तीन साथीदार फरारी आहेत.

सूत्रांनी सांगितले, की राहुल गजानन इंगळे (20, टेंभर्णा ता. खामगाव) हा गजानन नरसिंगराव टिकार यांच्‍या मालकीच्या भवानी पेट्रोल पंपावर त्‍याचे काका संदीप इंगळे यांच्‍यासोबत वर्षभरापासून काम करतो. 26 जूनच्‍या रात्री 8:30 च्‍या सुमारास पंपावर असताना दोघे जण मोटारसायकलवर पेट्रोल भरायला आले. कर्मचारी उमेश रामेकर याने त्याच्‍या मोटारसायकलमध्ये 100 रुपयांचे पेट्रोल टाकले व पैसे राहुलला घ्यायला सांगितले. राहुलने त्‍यांना पैसे मागितले असता दोघांनी त्‍याला शिविगाळ केली. शिव्या देऊ नका, असे राहुल म्‍हणाला असता दोघे त्‍याच्‍या अंगावर धावून आले. त्‍यानंतर ते ‘येथेच थांब तुला पाहून घेतो’, अशी धमकी देऊन निघून गेले. त्‍यानंतर अर्ध्या तासाने वाद घालणारे दोघे हे सोबत आणखी दोघांना घेऊन पंपावर आले. पुन्‍हा त्याच मोटारसायकलमध्ये 20 रुपयांचे पेट्रोल टाकले व पंपाच्या एका बाजूला जमले.

त्‍यांनी राहुलला इशारा करून बोलावले व अश्लील शिविगाळ करू लागले. त्यांच्‍यापैकी लाल काळे शर्ट अंगात असलेल्या एकाने कमरेचा चाकू काढून राहुलच्‍या हातावर वार केला. ते पाहून त्‍याचे काका संदीप इंगळे आणि पंपावरील कर्मचारी अंकुश माळी, अंकुश मोरे, नागेश सोळंके, उमेश रामेकर वाचविण्यासाठी धावले. त्‍या टोळक्‍याने त्यांच्‍यावरही हल्ला करून त्यांना मारहाण केली. चाकू हिसकावताना संदीप इंगळे यांच्या हाताला जखमा झाल्या. आरडाओरड झाल्याने लोक जमू लागल्याने तिघे पळून गेले. मात्र एकाला पंपावरील कर्मचाऱ्यांनी धरून ठेवले. त्याने स्वत:चे नाव प्रकाश रुपलाल सोळंके तर त्याच्‍या साथीदारांची नावे वैभव (25, मोटायसायकलवाला), गौरव मिश्रा (19) आणि हिरानगर येथे राहणारा काळे ट्रकवाला (20) असे सांगितले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्‍थळी आले. त्‍यांनी हल्लेखोराला ताब्‍यात घेतले. तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.