खामगावनंतर आता लोणारमध्येही तशीच घटना… बैल धुण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना देऊळगाव कुंडपाळ (ता. लोणार) येथे काल, ५ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. शंकर बंडू सरोदे (१७) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. लोणार -मंठा मार्गावरील अंभोरा शिवारातील तलावावर तो मित्रांसोबत बैल धुण्यासाठी गेला होता. तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज …
 
खामगावनंतर आता लोणारमध्येही तशीच घटना… बैल धुण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना देऊळगाव कुंडपाळ (ता. लोणार) येथे काल, ५ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्‍या सुमारास घडली.

खामगावनंतर आता लोणारमध्येही तशीच घटना… बैल धुण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्‍यू

शंकर बंडू सरोदे (१७) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. लोणार -मंठा मार्गावरील अंभोरा शिवारातील तलावावर तो मित्रांसोबत बैल धुण्यासाठी गेला होता. तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. मित्रांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर गावात ही माहिती देण्यात आली. तलावावर नागरिकांची गर्दी जमली. घटनास्थळी लोणारचे नायब तहसीलदार हेमंत पाटील, लोणार पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप ठाकूर, पोहेकाँ गजानन धोंडगे यांनी धाव घेतली.

नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करण्यात आला. लोणार पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. बैल धुण्यासाठी गेल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल, ५ सप्टेंबर रोजी खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथेही समोर आली होती. आशुतोष निरंजन सुरवाडे (२२) या तरुणाचा मृत्यू झाला होता.