खामगावमध्ये अनोखे आंदोलन… चिखलात लोळत नगरपालिकेला दिले निवेदन!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागातील बिलाला मशिदीजवळील रस्त्यावर मुरुम टाकून पक्का रस्ता करावा, या मागणीसाठी एमआयएमच्या शहराध्यक्षाने अनोखे आंदोलन केले. चिखलात लोळून, चिखलाने माखून नगरपालिका गाठली आणि मागणीचे निवेदन मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिले. त्यांच्या या आंदोलनाची शहरभर चर्चा होत आहे. मो. आरीफ अ. लतीफ यांनी हे आंदोलन केले. त्यांनी निवेदनात …
 
खामगावमध्ये अनोखे आंदोलन… चिखलात लोळत नगरपालिकेला दिले निवेदन!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील बर्डे प्‍लॉट भागातील बिलाला मशिदीजवळील रस्‍त्‍यावर मुरुम टाकून पक्‍का रस्‍ता करावा, या मागणीसाठी एमआयएमच्या शहराध्यक्षाने अनोखे आंदोलन केले. चिखलात लोळून, चिखलाने माखून नगरपालिका गाठली आणि मागणीचे निवेदन मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिले. त्‍यांच्‍या या आंदोलनाची शहरभर चर्चा होत आहे.

मो. आरीफ अ. लतीफ यांनी हे आंदोलन केले. त्‍यांनी निवेदनात म्‍हटले आहे, की बिलाला मशिदीला जोडणाऱ्या रस्‍त्‍यावर व गल्लीत मोठ्या प्रमाणावर चिखल साचत आहे. त्‍यामुळे तेथील रहिवाशांना व मशिदीत येणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्‍या दिवसांत हा त्रास वाढतो. ही समस्या त्‍वरित निकाली काढून चांगला रस्‍ता करावा, अशी मागणीही केली आहे. पक्‍का रस्‍ता न झाल्यास नगरपरिषदेमध्ये याच रस्‍त्‍यावरील चिखल फेकण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.