खामगावमध्ये गुटख्याची वाहतूक करताना दोघांना पकडले; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करताना शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई काल, 14 जूनच्या रात्री साडेनऊच्या सुमारास खामगाव शहरातील सुटाळा बुद्रूक येथील एमआयडीसी टी पॉईंटवर केली. शेख समीर शेख ईसा (25, रा. जमजमनगर, शेगाव), इरफान खान रहीम खान (27, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. …
 
खामगावमध्ये गुटख्याची वाहतूक करताना दोघांना पकडले; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करताना शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई काल, 14 जूनच्‍या रात्री साडेनऊच्या सुमारास खामगाव शहरातील सुटाळा बुद्रूक येथील एमआयडीसी टी पॉईंटवर केली.

शेख समीर शेख ईसा (25, रा. जमजमनगर, शेगाव), इरफान खान रहीम खान (27, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी नाकेबंदी केली होती. यावेळी एमएच 28 एबी 0862 क्रमाकांच्या ॲपेची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळला. केसरयुक्त विमल पान मसाला 416पाकीट, व्ही-1 तंबाखूचे 416 पाकीट असा एकूण 90 हजार 272 रुपयांचा गुटखा व ॲपे असा एकूण 2 लाख 40 हजार 272 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.