खामगावमध्ये शाहरुख खानविरुद्ध गुन्‍हा दाखल

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहर पोलिसांनी शाहरुख खानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अर्थात हा शाहरुख खान म्हणजे आपला अभिनेता नसून, बर्डे प्लॉट भागातील रहिवासी एक तरुण आहे. ज्याने काल, 10 जूनला सायंकाळी इम्रान खानवर हल्ला चढवला. आता हा इम्रान खानही ॲक्टर नसणार हे तुम्हाला कळले असेलच. इम्रान खान रशीद खान (25, रा. बर्डे …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव शहर पोलिसांनी शाहरुख खानविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. अर्थात हा शाहरुख खान म्‍हणजे आपला अभिनेता नसून, बर्डे प्‍लॉट भागातील रहिवासी एक तरुण आहे. ज्‍याने काल, 10 जूनला सायंकाळी इम्रान खानवर हल्ला चढवला. आता हा इम्रान खानही ॲक्‍टर नसणार हे तुम्‍हाला कळले असेलच.

इम्रान खान रशीद खान (25, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) याने दिलेल्या तक्रारीनुसार काल सायंकाळी 6:30 च्या सुमारास शाहरुख खान युसूफ खानने (25, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) इम्रानच्या घरासमोर येऊन त्‍याच्या आईला जुन्या भांडणावरून शिविगाळ केली. यावेळी इम्रानने शाहरुख शिव्या देऊ नको असे म्‍हटले असता त्‍याने इम्रानच्या हातावर ब्लेडचे वार करून जखमी केले.