खामगावात ‘दबंग’च्‍या मदतीला दबंग-२; पांडुरंग इंगळे झाले खामगाव शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जलंबचे ठाणेदार पांडुरंग इंगळे यांची दोन आठवड्यांपूर्वी जलंबवरून बुलडाणा येथे बदली करण्यात आली होती. जलंब पोलीस ठाण्यात कार्यरत असताना वाळूमाफियांचे कर्दनकाळ ठरलेले सहायक पोलीस निरिक्षक श्री. इंगळे यांची नियुक्ती काल, 26 फेब्रुवारीला खामगाव शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. यामुळे खामगाव शहरातील माफिया मंडळी धास्तावली आहे. काही दिवसांपूर्वी कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः जलंबचे ठाणेदार पांडुरंग इंगळे यांची दोन आठवड्यांपूर्वी जलंबवरून बुलडाणा येथे बदली करण्यात आली होती. जलंब पोलीस ठाण्यात कार्यरत असताना वाळूमाफियांचे कर्दनकाळ ठरलेले सहायक पोलीस निरिक्षक श्री. इंगळे यांची नियुक्‍ती काल, 26 फेब्रुवारीला खामगाव शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. यामुळे खामगाव शहरातील माफिया मंडळी धास्‍तावली आहे.

काही दिवसांपूर्वी कर्तव्यदक्ष जिल्‍हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जिल्ह्यातील अनेक ठाणेदार नियंत्रण कक्षात बदली करून आणले होते. यात श्री. इंगळे यांचाही समावेश होता. कालांतराने या अधिकाऱ्यांची बदली वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षकांनी श्री. इंगळे यांची खामगाव शहर पोलीस ठाण्यात बदली केली. आधीच आपल्‍या दबंगगिरीने खामगावात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ठाणेदार श्री. अंबुलकर यांच्‍या मदतीला श्री. इंगळे यांच्‍या रूपाने ‘दबंग- 2’ अधिकारी देण्यात आल्याने खामगावातील गुन्‍हेगारी आणि माफियागिरीला वेसन घालण्यात पोलीस प्रशासनाला यश येईल असे मानले जात आहे.