खामगाव ः अल्पवयीन मुलीला टक लावून पहायचा; एक दिवस….

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना खामगाव शहरातील चांदमारी फैल भागात 16 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घरासमोरील सै. राजीक सै. सादिक (18) हा तिच्याकडे नेहमी टक लावून पहायचा. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने वाईट उद्देशाने हात धरला …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना खामगाव शहरातील चांदमारी फैल भागात 16 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.
अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घरासमोरील सै. राजीक सै. सादिक (18) हा तिच्याकडे नेहमी टक लावून पहायचा. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने वाईट उद्देशाने हात धरला आणि गैरवर्तन केले. मुलीने आरडाओरड करून आईला आवाज दिला असता खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी त्‍याने दिली. खामगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सै. राजीकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.