खामगाव शहरात घर फोडून सोन्याची पोत लांबवली!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घर फोडून चोरट्यांनी कपाटातून 13 ग्रॅम सोन्याची 35 हजार रुपयांची पोत चोरून नेली. ही घटना खामगाव शहरातील आदर्शनगरात 24 जानेवारीच्या दुपारी चारच्या सुमारास समोर आली.सौ. प्रीती सागर गाडे (रा. आदर्शनगर खामगाव) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात या घरफोडीची तक्रार दिली. सौ. प्रीती व त्यांचे पती सागर गाडे …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घर फोडून चोरट्यांनी कपाटातून 13 ग्रॅम सोन्याची 35 हजार रुपयांची पोत चोरून नेली. ही घटना खामगाव शहरातील आदर्शनगरात 24 जानेवारीच्या दुपारी चारच्या सुमारास समोर आली.
सौ. प्रीती सागर गाडे (रा. आदर्शनगर खामगाव) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात या घरफोडीची तक्रार दिली. सौ. प्रीती व त्यांचे पती सागर गाडे दोघेही शेगाव येथील युनियन बँकेत नोकरी करतात. राहणे खामगावला असल्याने रोज दोघे जाणे येणे करतात. सौ. प्रीती गाडे त्यांच्या वडिलांसोबत 23 जानेला दुपारी अकोला येथे गेल्या होत्या. त्या 24 जानेवारीला दुपारी परत आल्या असता त्यांच्या घरातील हॉलच्या कुलूपचे स्क्रू काढलेले दिसले. घराची पाहणी केल्यावर कपाटातील ठेवलेली सोन्याची पोथ 13 ग्रॅम अंदाजे किंमत 35 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकॉ गजानन बोरसे करत आहेत.