खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी बुलडाणा अर्बन सरसावली, 100 कोटींचे रेल्वे बॉण्ड खरेदीची ग्वाही!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रस्तावित खामगाव-जालना रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी बुलडाणा अर्बन बँकेनेही मदतीचा हात पुढे केला असून, या रेल्वेमार्गासाठी महामंडळ स्थापन केल्यास तो प्रत्यक्षात आणण्यासाठी बुलडाणा अर्बन 100 कोटी रुपयांचे रेल्वे बॉण्ड खरेदी करेल, अशी ग्वाही बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली. बुलडाणा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रस्तावित खामगाव-जालना रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी बुलडाणा अर्बन बँकेनेही मदतीचा हात पुढे केला असून, या रेल्वेमार्गासाठी महामंडळ स्थापन केल्यास तो प्रत्यक्षात आणण्यासाठी बुलडाणा अर्बन 100 कोटी रुपयांचे रेल्वे बॉण्ड खरेदी करेल, अशी ग्वाही बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली.

बुलडाणा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे संचालक या नात्याने बुलडाणा व जालना जिल्ह्यातील पतसंस्थांच्या माध्यमातून अणखी 100 कोटींचे रेल्वे बॉण्ड असे एकूण 200 कोटी रुपयांचे रेल्वे बॉण्ड खरेदीसाठी आपण पुढाकार घेऊ, असेही त्यांनी सांगितले. सध्या या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी पाच सदस्यीय पथक बुलडाणा जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून, आज ते खामगाव येथे भेट देणार आहे.