खामगाव नगर परिषदेच्या बांधकाम सभापती सीमा वानखेडे यांचा राजीनामा; ‘कारण’ सांगून उडवली खळबळ!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगरपरिषदेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राजकीय वातावरण तापत आहे. निवडणुका ऐन तोंडावर आल्या असताना खामगाव नगरपरिषदेच्या बांधकाम सभापती सौ. सीमा शांताराम वानखेडे यांनी पदाचा राजीनामा आज, 24 मे रोजी दिला. राजीनामा पत्रात त्यांनी दिलेल्या कारणामुळे खळबळ उडाली आहे. पदाचा राजीनामा सौ. वानखेडे यांनी नगराध्यक्षा अनिता …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  नगरपरिषदेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राजकीय वातावरण तापत आहे. निवडणुका ऐन तोंडावर आल्या असताना खामगाव नगरपरिषदेच्या बांधकाम सभापती सौ. सीमा शांताराम वानखेडे यांनी पदाचा राजीनामा आज, 24 मे रोजी दिला. राजीनामा पत्रात त्‍यांनी दिलेल्या कारणामुळे खळबळ उडाली आहे.

पदाचा राजीनामा सौ. वानखेडे यांनी नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्याकडे दिला आहे. नगरपरिषद प्रशासन तसेच पक्षाचे पदाधिकारी हे शहरातील विकास कामांकरिता तसेच जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याकरिता सहकार्य करत नसल्याचा आरोप त्यांनी राजीनामा पत्रात  केला आहे. त्‍यांच्‍या असहकार्यामुळे बांधकाम सभापती पदावर राहून न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे बांधकाम सभापती पदावर निष्क्रिय राहणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. पत्राच्या प्रतिलिपी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांना पाठविण्यात आल्या आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षसंघटनेची जबाबदारी असलेल्या आमदार फुंडकरांच्या बालेकिल्यातच पक्षांतर्गत धुसफूस यानिमित्ताने समोर आली आहे.