खामगाव बाजार समितीत उद्यापासून भरणार गुरांचा बाजार!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुरांचा बाजार १७ जूनपासून जनुना उपबाजारात भरायला सुरुवात होणार आहे. मात्र दुपारी ४ पर्यंत खरेदी-विक्री व्यवहार आटोपण्याची सक्ती बाजार समितीने केली आहे. गुरे, शेळी, मेंढी, म्हैस बाजार भरवला जाणार आहे. बाजारात कोरोनाविषयक नियम पाळणे बंधनकारक आहे. विनामास्क कुणालाही बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय सुरक्षित …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीतील गुरांचा बाजार १७ जूनपासून जनुना उपबाजारात भरायला सुरुवात होणार आहे. मात्र दुपारी ४ पर्यंत खरेदी-विक्री व्‍यवहार आटोपण्याची सक्‍ती बाजार समितीने केली आहे.

गुरे, शेळी, मेंढी, म्‍हैस बाजार भरवला जाणार आहे. बाजारात कोरोनाविषयक नियम पाळणे बंधनकारक आहे. विनामास्‍क कुणालाही बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे. विनामास्‍क कुणी आढळला तर ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कुणाला ताप, सर्दी असल्या बाजारात येऊ नये, असे आदेश समितीचे प्रशासक डी. पी. जाधव, सचिव एम. एस. भिसे यांनी काढले आहेत.