खामगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षाविरुद्ध बालिकेच्‍या विनयभंगाचा गुन्‍हा

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरासमोर खेळणाऱ्या ९ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्या प्रकरणी खामगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात काल, २९ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. अभिषेक अग्रवाल (३९)असे आरोपीचे नाव आहे. काल सायंकाळी सातच्या सुमारास ९ वर्षीय बालिका घरासमोर खेळत होती. त्यावेळी अभिषेक अग्रवालने तिला चॉकलेटचे अामिष दाखवले. तिला जवळ …
 
खामगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षाविरुद्ध बालिकेच्‍या विनयभंगाचा गुन्‍हा

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरासमोर खेळणाऱ्या ९ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्या प्रकरणी खामगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात काल, २९ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. अभिषेक अग्रवाल (३९)असे आरोपीचे नाव आहे.

काल सायंकाळी सातच्या सुमारास ९ वर्षीय बालिका घरासमोर खेळत होती. त्यावेळी अभिषेक अग्रवालने तिला चॉकलेटचे अामिष दाखवले. तिला जवळ बोलावून वाईट उद्देशाने स्पर्श केला. त्यामुळे घाबरलेली मुलगी घरात जाऊन रडू लागली. तिच्या आईने याबाबत विचारणा केली असता तिने घडलेली हकीकत सांगितली. आईने लगेच शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबतची तक्रार दिली. तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अभिषेक अग्रवाल याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदिप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे करीत आहेत.