खामगाव शहरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; कॉम्‍प्‍युटर क्लासला गेली होती…

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कॉम्प्युटर क्लासला गेलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. ही घटना काल, १० ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास घडली. मुलीच्या वडिलांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन तुळशीराम बावस्कर (रा. सुटाळा, ता. खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मोठी मुलगी प्रिया कॉम्प्युटर क्लासला खामगाव येथे …
 
खामगाव शहरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; कॉम्‍प्‍युटर क्लासला गेली होती…

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कॉम्‍प्‍युटर क्लासला गेलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. ही घटना काल, १० ऑक्‍टोबरला दुपारी चारच्या सुमारास घडली. मुलीच्या वडिलांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन तुळशीराम बावस्कर (रा. सुटाळा, ता. खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मोठी मुलगी प्रिया कॉम्प्युटर क्लासला खामगाव येथे गेली होती. दुपारी दीडला क्लास संपला. तुम्ही मला घ्यायला या, असा फोन तिने वडिलांना केला. तेव्हा मी थकलोय, असे वडिलांनी म्हटल्याने मी ऑटोने घरी येते, असे ती म्हणाली. दुपारी ४ वाजेपर्यंत प्रिया परतली नाही. तिचा फोन बंद येत असल्याचे वडिलांनी खामगावला जाऊन क्लासेसच्या संचालकांना विचारणा केली. तेव्हा तुमची मुलगी दुपारीच घरी गेली, असे त्यांनी सांगितले. वडिलांनी खामगाव परिसरात तसेच नातेवाइकांकडे शोध घेऊन ती मिळून आली नाही. त्यामुळे कुणीतरी मुलीचे अपहरण केले असावे, असा संशय तिच्या वडिलांना आहे. तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.