खामगाव : 20 हजारांची पिशवी ओट्यावर ठेवली अन्‌…

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुकान उघडण्यासाठी हातातील 20 हजार रुपयांची पिशवी ओट्यावर ठेवली आणि दुकान उघडण्यात गुंतल्याची संधी साधून चोरट्याने ही पिशवीच लांबवली. ही घटना खामगाव शहरात काल, 19 मार्चला घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश राजेंद्र खंडेलवाल (रा. श्रीरामनगर, तलाव रोड, खामगाव) यांचे भुसावळ चौकात दुकान आहे. …
 

खामगाव  (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुकान उघडण्यासाठी हातातील 20 हजार रुपयांची पिशवी ओट्यावर ठेवली आणि दुकान उघडण्यात गुंतल्याची संधी साधून चोरट्याने ही पिशवीच लांबवली. ही घटना खामगाव शहरात काल, 19 मार्चला घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश राजेंद्र खंडेलवाल (रा. श्रीरामनगर, तलाव रोड, खामगाव) यांचे भुसावळ चौकात दुकान आहे. काल सकाळी 9 वाजता ते दुकान उघडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत  नगदी 20 हजार रुपये असलेली पिशवी होती. दुकान उघडण्यासाठी त्यांनी हातातील पिशवी दुकानाच्या ओट्यावर ठेवली. त्‍याचवेळी कुणीतरी संधी साधत ती पिशवी चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.