खासदार आक्रमक होताच वाघ कुटुंबावरील तीन हल्लेखोरांना अटक; ‘डीवायएसपीं’नी दिली तपासाला गती

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चितोडा (अंबिकापूर) (ता. खामगाव) येथे 19 जूनला वाघ कुटूंबावर झालेल्या हल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या पथकाने आज, 28 जूनला सायंकाळी ही कारवाई केली. नितेश हिवराळे, योगेश हिवराळे, बाळू हिवराळे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल …
 
खासदार आक्रमक होताच वाघ कुटुंबावरील तीन हल्लेखोरांना अटक; ‘डीवायएसपीं’नी दिली तपासाला गती

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चितोडा (अंबिकापूर) (ता. खामगाव) येथे 19 जूनला वाघ कुटूंबावर झालेल्या हल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या पथकाने आज, 28 जूनला सायंकाळी ही कारवाई केली. नितेश हिवराळे, योगेश हिवराळे, बाळू हिवराळे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणातील पोत्या उर्फ रमेश हिवराळे हा अकोल्यात उपचार घेत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

19 जून रोजी खामगाव तालुक्यातील चितोडा (अंबिकापूर) येथे वाघ आणि हिवराळे परिवारात हाणामारी झाली होती. यात पोत्या उर्फ रमेश हिवराळे याने जमाव जमवून वाघ परिवाराचे घर आणि ट्रॅक्टर जाळण्याचाही प्रयत्न केला होता. या हाणामारीत पोत्यालाही दुखापत झाल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आले होते. त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. काल चितोडा येथे खासदार प्रतापराव जाधव यांनी भेट दिली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी खामगाव ग्रामीणचे ठाणेदार रफिक शेख व बिट जमादार राजेश गाडेकर यांचे निलंबन करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केल्याचे सांगितले होते. पोत्या उर्फ रमेश हिवराळे या गुंडाला ठाणेदार अभय देतात. त्यामुळे चितोडा दोन नंबरच्या धंद्यांचे माहेरघर आहे, असा गंभीर आरोपही त्‍यांनी केला होता. याप्रकरणी हिवराळे गटातील कुणालाही अटक नसल्याने त्यांनी ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाला गती दिली. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी यासाठी चार पथके नेमली होती. आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तिघांना चितोडा शेतशिवारातून ताब्यात घेतले.