खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्‍यात!

अमरावती (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः मुंबई उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याबरोबरच दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करून राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. राणा यांनी शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस …
 

अमरावती (महाराष्ट्र न्‍यूज लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मुंबई उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याबरोबरच दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्‍यामुळे त्‍यांची खासदारकी धोक्यात आली आहे.

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करून राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. राणा यांनी शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोरदेखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप करत अडसूळ यांनी राणा यांची खासदारकी रद्द करण्यासाठी उच्च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. मूळ कागदपत्रे पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचा आदेश न्यायालयाने राणा यांना दिला होता.

अखेर सुनावणीअंती त्‍यांचं जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल न्‍यायालयाने दिला. या निर्णयाला राणा या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. मात्र खोटे जात प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवल्याबद्दल राणा यांच्या विरोधात तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.