खिडकीत येऊन इशाऱ्याने बाेलावले बाहेर, ती बाहेर आली तर काढली छेड!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराच्या खिडकीजवळ येत विवाहितेला इशारे करून बाहेर बोलावणाऱ्या युवकाविरुद्ध जलंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खेर्डा (ता. खामगाव) येथे २२ ऑगस्टच्या रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. २४ वर्षीय विवाहितेने या प्रकरणात पोलिसांत तक्रार दिली. परमेश्वर बबन दारोले (रा.खेर्डा) असे छेड काढणाऱ्याचे नाव आहे. तो विवाहितेच्या घराच्या खिडकीजवळ आला. तिला …
 
खिडकीत येऊन इशाऱ्याने बाेलावले बाहेर, ती बाहेर आली तर काढली छेड!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराच्‍या खिडकीजवळ येत विवाहितेला इशारे करून बाहेर बोलावणाऱ्या युवकाविरुद्ध जलंब पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना खेर्डा (ता. खामगाव) येथे २२ ऑगस्‍टच्‍या रात्री पावणेनऊच्‍या सुमारास घडली.

२४ वर्षीय विवाहितेने या प्रकरणात पोलिसांत तक्रार दिली. परमेश्वर बबन दारोले (रा.खेर्डा) असे छेड काढणाऱ्याचे नाव आहे. तो विवाहितेच्‍या घराच्‍या खिडकीजवळ आला. तिला हाताने इशारे करू लागला. इशाऱ्यानेच तिला घराबाहेर बोलावले. ती घराबाहेर आली असता तिची छेड काढली. पीडितेच्‍या सासऱ्याने त्‍याला जाब विचारला असता परमेश्वरने शिविगाळ केली व मारहाण करण्याची धमकी दिली. त्‍यामुळे विवाहितेने जलंब पोलीस ठाणे गाठले. पोहेकाँ सुपडसींग चव्हाण तपास करत आहेत.