खून का बदला… वकिलाला भेटण्यासाठी निघालेल्या आरोपीवर सशस्‍त्र हल्ला; खामगाव शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खुनाच्या गुन्ह्यात साडेतीन वर्षे जेल भोगून परतलेल्या आरोपीवर सशस्त्र हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. ही काल, 14 फेब्रुवारीला दुपारी खामगाव शहरातील फरशी भागात घडली.अमोल जीवन हिवरे (29, रा. सुटाळा बुद्रूक, गौरानगर) याचे 2012 मध्ये मटनाचे दुकान होते. त्यावेळी त्याच्यासोबत धम्मा हेलोडे याचा वाद होऊन अमोलने त्याचा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खुनाच्‍या गुन्ह्यात साडेतीन वर्षे जेल भोगून परतलेल्या आरोपीवर सशस्‍त्र हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. ही काल, 14 फेब्रुवारीला दुपारी खामगाव शहरातील फरशी भागात घडली.
अमोल जीवन हिवरे (29, रा. सुटाळा बुद्रूक, गौरानगर) याचे 2012 मध्ये मटनाचे दुकान होते. त्यावेळी त्याच्यासोबत धम्मा हेलोडे याचा वाद होऊन अमोलने त्‍याचा खून केला होता. या प्रकरणात अमोल साडेतीन वर्षे बुलडाणा कारागृहात होता. या प्रकरणी अजून न्‍यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, काल दुपारी तो त्याच्या वकिलांना भेटण्यासाठी फरशी येथे आला. ऑटोमध्ये बसलेला असताना धम्माचा भाऊ करण गोपाल हेलोडे (रा. खामगाव )व त्याच्यासोबतच्या 4 जणांनी अमोलवर हल्ला चढवला. यात त्‍याच्‍या डोळ्यावर, डाव्या- उजव्या हातावर धारदार शस्‍त्राने वार करण्यात आले. या अमोल गंभीर जखमी झाला. त्‍याला उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी अमोलच्या तक्रारीवरून करण यांच्यासह 5 जणांविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक राहुल जगदाळे करीत आहेत.