गच्‍चीवर झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना वरवंड (ता. बुलडाणा) येथे काल, 11 जूनच्या रात्री घडली. मुलीच्या आईने आज सकाळी दिलेल्या तक्रारीवरून दत्ता तुकाराम पवार (30, रा. वरवंड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार काल त्यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता. त्यांच्या मुली घराशेजारीच …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना वरवंड (ता. बुलडाणा) येथे काल, 11 जूनच्‍या रात्री घडली. मुलीच्या आईने आज सकाळी दिलेल्या तक्रारीवरून दत्ता तुकाराम पवार (30, रा. वरवंड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार काल त्यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता. त्यांच्या मुली घराशेजारीच राहणाऱ्या नातेवाइकाच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. रात्री 12 च्या सुमारास त्यांना त्यांच्या मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला असता त्यांनी व त्यांच्या नंदईने धावत जाऊन बघितले असता गच्चीवर आरोपी दत्ता तुकाराम पवार उभा होता.मुलीला याबद्दल विचारला असता तिने सांगितले की, दत्ताने पाणी मागितले. पाणी देऊन माझ्या जागेवर झोपले असता तो शेजारी येऊन झोपला व पोटावर कमरेवर हात फिरवून जवळ ओढले. त्यानंतर पीडितेच्‍या आईने आरोपीला जाब विचारला असता तो घाबरून तिथून पळून गेला. आज सकाळी याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दत्ता पवार (30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.