‘गजानना’ने वाचवले सहा प्रवाशांचे प्राण; सैलानीला जाणाऱ्या बसचा स्‍टेरिंग रॉड तुटल्‍याने अपघात!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्टेरिंगचा रॉड तुटल्याने एसटी बसचा अपघात झाला. सुदैवाने चालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र बसचे नुकसान झाले आहे. बसमध्ये सहा प्रवासी होते. ही घटना सागवन (ता. बुलडाणा) पुलाजवळ आज, 20 मार्चच्या सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.बुलडाणा आगाराची बस (क्रमांक एमएच 40 एन 8488) …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्‍टेरिंगचा रॉड तुटल्याने एसटी बसचा अपघात झाला. सुदैवाने चालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र बसचे नुकसान झाले आहे. बसमध्ये सहा प्रवासी होते. ही घटना सागवन (ता. बुलडाणा) पुलाजवळ आज, 20 मार्चच्‍या सकाळी साडेसहाच्‍या सुमारास घडली.
बुलडाणा आगाराची बस (क्रमांक एमएच 40 एन 8488) बुलडाण्यावरून सैलानीला जात होती. सागवनजवळ बस येताच अचानक स्‍टेरिंगचा रॉड तुटला. त्‍यामुळे बस अनियंत्रित झाली. त्‍याही परिस्‍थितीत चालक गजानन उबरहंडे (रा. पांग्री उबरहंडे)
यांनी बसवर नियंत्रण मिळविण्याचा कसोशीने प्रयत्‍न केला आणि त्‍यात ते यशस्वी झाले. बसच्‍या वेगावर नियंत्रण मिळवल्याने कठड्याला धडकून थांबली. यात बसचे नुकसान झाले. बसमधील सहाही प्रवासी आणि चालक-वाहकांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातामुळे आगारातील भंगार बसेसचा प्रश्न पुन्‍हा ऐरणीवर आला आहे.