गटशिक्षणाधिकाऱ्याने शिक्षिकेला केली शरीरसुखाची मागणी!

सातारा ः साताऱ्याचा गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ एका शिक्षिकेला वारंवार त्रास द्यायचा. तिच्या शाळेवर वारंवार तपासणीच्या नावाखाली यायचा. तपासणीतील कथित त्रुटी दाखवून कारवाईची धमकी द्यायचा. कारवाईतून वाचण्यासाठी शरीरसुखाची धमकी द्यायला लागला. धुमाळ याच्या त्रासाला कंटाळून अखेर या शिक्षिकेने पोलिसांत धाव घेतली. फिर्याद दाखल झाल्यानंतर जाग आलेल्या शिक्षण विभागानं त्याला निलंबित केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …
 

सातारा ः साताऱ्याचा गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ एका शिक्षिकेला वारंवार त्रास द्यायचा. तिच्या शाळेवर वारंवार तपासणीच्या नावाखाली यायचा. तपासणीतील कथित त्रुटी दाखवून कारवाईची धमकी द्यायचा. कारवाईतून वाचण्यासाठी शरीरसुखाची धमकी द्यायला लागला. धुमाळ याच्या त्रासाला कंटाळून अखेर या शिक्षिकेने पोलिसांत धाव घेतली. फिर्याद दाखल झाल्यानंतर जाग आलेल्या शिक्षण विभागानं त्याला निलंबित केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना हे पाऊल उचलावं लागलं.

संजय धुमाळ हा या शिक्षिकेच्या असह्यातेचा गैरफायदा घ्यायचा. ही शिक्षिका सातारा तालुक्यात नोकरीला आहे. तिच्या शाळेवर धुमाळच्या फेऱ्या वाढल्या होत्या. तो तिला सतत शाळा तपासणीच्या नावाखाली त्रास देत होता. कारवाईची भीती दाखवून त्याने संबंधित शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी केली. याबाबत संबंधित शिक्षिकेने जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सातारा पंचायत समितीतीतल विशाखा समितीला पत्र पाठविले होते. त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पंचायत समितीच्या विशाखा समितीने शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली. त्यामुळं या शिक्षिकेने अखेर सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्यात धुमाळ यास अटक करण्यात आली होती. न्यायालयाने धुमाळ याची जामिनावर सुटका केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा, शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी शासनाकडे याबाबतचा अहवाल पाठवला. त्यानुसार धुमाळला निलंबित करण्यात आले.