“गटारी’ साजरी करण्यासाठी चोरून नेले २ बोकूड!; महिलेने बघितल्याने फुटले बिंग!!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल, ८ ऑगस्टला गटारी अमावस्या होती. श्रावण आरंभ होण्याअगोदर अनेकांनी दारू, मांसाहार फस्त केला. यासाठी जिल्ह्यात हजारो बोकडांचा बळी गेला. गटारी साजरी करण्यासाठी दोन महाभागांनी शक्कल लढवली. चक्क दोन बोकूड चोरून नेले. बोकूड चोरलेही, पण ते चोरताना मालकीनीने बघितल्याने त्यांचे बिंग फुटले. बोकडाच्या मालकीन महिलेने खामगाव शहर …
 
“गटारी’ साजरी करण्यासाठी चोरून नेले २ बोकूड!; महिलेने बघितल्याने फुटले बिंग!!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल, ८ ऑगस्‍टला गटारी अमावस्या होती. श्रावण आरंभ होण्याअगोदर अनेकांनी दारू, मांसाहार फस्त केला. यासाठी जिल्ह्यात हजारो बोकडांचा बळी गेला. गटारी साजरी करण्यासाठी दोन महाभागांनी शक्‍कल लढवली. चक्‍क दोन बोकूड चोरून नेले. बोकूड चोरलेही, पण ते चोरताना मालकीनीने बघितल्याने त्‍यांचे बिंग फुटले. बोकडाच्‍या मालकीन महिलेने खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी या दोन चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

गं. भा. कमलबाई भीराव हेलोडे (५०, रा. डीपी रोड, राजेश शांताराम बुंदले यांचा मळा, खामगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. बालू वाकोडे व अनिल सकळकळे (दोन्ही रा. महाकाल चौक खामगाव) अशी या बोकडचोरांची नावे आहेत. काल, ८ ऑगस्‍टला दुपारी १२ च्‍या सुमारास त्‍यांनी हा प्रताप केला. कमलबाई घरामागे काम करत असताना त्‍यांचे १ वर्षांचे दोन बोकूड (किंमत ८ हजार रुपये) बालू आणि अनिल मोटारसायकलवर टाकून घेऊन जाताना दिसले. कमलबाई आरडाओरड करत असतानाच त्‍यांनी बोकूड घेऊन पळ काढला. तपास एनपीसी मनोहर गोरे करत आहेत.