गढी कोसळून मुलगा ठार, बालिका गंभीर; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गढीची माती अंगावर कोसळून 13 वर्षीय मुलगा ठार तर 10 वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 18 एप्रिलला टाकळी हाट (ता. शेगाव) येथे 18 एप्रिलला सकाळी घडली. तुकाराम उर्फ प्रसाद रामभाऊ फाळके (13) व भक्ती संतोष ताथोड (10) हे खेळत असताना गढीची माती अचानक त्यांच्यावर …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गढीची माती अंगावर कोसळून 13 वर्षीय मुलगा ठार तर 10 वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 18 एप्रिलला टाकळी हाट (ता. शेगाव) येथे 18 एप्रिलला सकाळी घडली.

तुकाराम उर्फ प्रसाद रामभाऊ फाळके (13) व भक्‍ती संतोष ताथोड (10) हे खेळत असताना गढीची माती अचानक त्‍यांच्‍यावर कोसळली. गावकऱ्यांची ही माहिती मिळताच सरपंच नंदलाल उन्‍हाळे व गावकऱ्यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन दोघांना बाहेर काढले. उपचारासाठी खामगावच्‍या खासगी रुग्‍णालयात धाव घेतली. मात्र उपचारादरम्‍यान तुकारामचा मृत्‍यू झाला. भक्‍तीवर उपचार सुरू आहेत.