गणराज्य दिनावरही कोरोनाचे सावट! यंदाचा समारंभ ठरणार मर्यादित

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने सर्व क्षेत्रांना अनेक महिने लॉकडाऊन केले, मर्यादित केले. सण उत्सवाचा रसभंग केला. यंदाचा जिल्ह्य मुख्यालयी आयोजित गणराज्य दिनाचा सोहळा देखील याला अपवाद नाहीये! यामुळे बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रम म्हणजे मिनी सोहळा ठरणार असल्याने राष्ट्रप्रेमी जनतेच्या आनंदावर विरजण पडले आहे.बुलडाण्यातील पोलीस कवायत मैदानावर दरवर्षी आयोजित गणराज्य दिन …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने सर्व क्षेत्रांना अनेक महिने लॉकडाऊन केले, मर्यादित केले. सण उत्सवाचा रसभंग केला. यंदाचा जिल्ह्य मुख्यालयी आयोजित गणराज्य दिनाचा सोहळा देखील याला अपवाद नाहीये! यामुळे बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रम म्हणजे मिनी सोहळा ठरणार असल्याने राष्ट्रप्रेमी जनतेच्या आनंदावर विरजण पडले आहे.
बुलडाण्यातील पोलीस कवायत मैदानावर दरवर्षी आयोजित गणराज्य दिन सोहळा म्हणजे राष्ट्र प्रेम जागविणारा, रंगरंगीला, वैविध्यपूर्ण कार्यक्रम असतो. त्याची तयारी किमान 1 महिन्यापूर्वीच सुरू होते. पोलिसांचा दमदार बँड, त्यावर पार पडणार्‍या पोलीस, होमगार्ड, एनसीसी, आरएससीपी पथकाच्या दिमाखदार परेड, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, पालकमंत्र्यांसह राजकारणी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी, कर्तबगार व्यक्ती, संघटनांचा सत्कार, शाळांच्या कवायती, सनई चौघड्याचे मधुर स्वर असा प्रजासत्ताक दिन समारंभाचा थाट असतो. हजारोंच्या संख्येतील दर्शक व बाळ गोपालांची तुफान गर्दी याला चार चांद लावणारा कळस ठरतो. मात्र यंदाचा सोहळा अत्यंत मर्यादित स्वरूपात साजरा होणार असून यावेळी मर्यादित शासकीय अधिकारी हजर राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दो गज दुरी अर्थात सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक आहे. पालकमंत्र्यांनी भाषण करणे ऐच्छिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने करावे. विविध सांस्कृतिक व खेळांचे आयोजन करू नये, असे बजावण्यात आले आहे. याशिवाय दरवर्षी काढण्यात येणार्‍या प्रभात फेर्‍या काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुख्य समारंभ म्हणजे ध्वजारोहण, मानवंदना, पालकमंत्र्यांच्या धुवांधार भाषण ऐवजी शुभ संदेश, वीर पत्नी, मातांना धनादेश, दोघा- तिघांना प्रशस्तीपत्र, चहापान व समारोप असा अत्यंत मर्यादित सोहळा राहणार आहे.