गणेशोत्सवही साधेपणानेच!; जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हावासियांना केल्यात “या’ सूचना!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काय आहेत सूचना…सार्वजनिक गणपतीसाठी गणेश मंडळाने परवानगी घेऊनच स्थापना करावी. खासगी जागेतच परवानगी घ्यावी. विनापरवानगी गणेश मंडळाची स्थापना करू नये. पर्यावरणपूरक मूर्ती बसवावी. सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट …
 
गणेशोत्सवही साधेपणानेच!; जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हावासियांना केल्यात “या’ सूचना!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्‍थितीचा विचार करून यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतच्‍या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

काय आहेत सूचना…
सार्वजनिक गणपतीसाठी गणेश मंडळाने परवानगी घेऊनच स्थापना करावी. खासगी जागेतच परवानगी घ्यावी. विनापरवानगी गणेश मंडळाची स्थापना करू नये. पर्यावरणपूरक मूर्ती बसवावी. सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट व घरगुतीसाठी २ फूट उंचीची मर्यादा मूर्तीसाठी ठेवण्यात आली आहे. विसर्जन घरच्या घरी करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावे. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची, थर्मल स्कॅनिंगची पर्याप्त व्यवस्था करावी. दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी सामाजिक अंतर ठेवावे. मास्क, सॅनीटायझरचा वापर करावा. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत. आगमन व विसर्जनावेळी ५ लोकांची उपस्थिती ठेवावी. विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमी वेळ थांबावे.

सुरक्षेच्यादृष्टीने लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. एकत्रित गणेश विसर्जनाची मिरवणूक काढू नये. आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमाकरिता गर्दी होणार नाही. ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटोकोरपणे पालन करावे. आरतीची वेळ सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ७ ते ९ दरम्यान राहील याची गणेश मंडळाने खबरदारी घ्यावी. आवश्यकतेनुसार दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट याद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे. शहरी भागात नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी स्थळ निश्चित करून नगर पालिकेचे वाहन प्रभाग निहाय उपलब्ध ठेवावे. विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करून त्या ठिकाणी सर्व सार्वजनिक व घरगुती गणपतीचे विसर्जन करावे. विसर्जन मार्गावर व गणेश मंडळाच्या परिसरात उघड्यावर मांस विक्री होणार नाही. मोकाट जनावरांचा बंदोबस्त होईल, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उत्सव सार्वजनिक न करता घरगुती पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.