“गण्या, नील्याने माझा बलात्कार केला, जिंदगी बरबाद केली, तुम्हाला सांगायची हिम्मत नव्हती म्हणून आत्महत्या केली!’; नांद्रा कोळीतील आत्महत्या केलेल्या तरुणीची सुसाईड नोट वाचून हादरले पोलीस!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बहीण- भावाच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना बुलडाणा तालुक्यात समोर आली आहे. नांद्रा कोळी (ता. बुलडाणा) येथे २० सप्टेंबर रोजी १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी घरातील भगवद्गीता या ग्रंथात सापडली असून, चिठ्ठी घेऊन तरुणीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातीलच …
 
“गण्या, नील्याने माझा बलात्कार केला, जिंदगी बरबाद केली, तुम्हाला सांगायची हिम्मत नव्हती म्हणून आत्महत्या केली!’; नांद्रा कोळीतील आत्महत्या केलेल्या तरुणीची सुसाईड नोट वाचून हादरले पोलीस!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बहीण- भावाच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना बुलडाणा तालुक्यात समोर आली आहे. नांद्रा कोळी (ता. बुलडाणा) येथे २० सप्टेंबर रोजी १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी घरातील भगवद्‌गीता या ग्रंथात सापडली असून, चिठ्ठी घेऊन तरुणीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातीलच दोन तरुणांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सुरेश काळवाघे (२८) आणि नीलेश एकनाथ मिसाळ (२५, दोघे रा. नांद्रकोळी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींपैकी गणेश हा तरुणीचा चुलतभाऊ आहे.

तरुणीने चिठ्ठीत लिहिले की, प्रिय पप्पा मला मरण्यासाठी भाग पाडणाऱ्या गण्या व नील्याने माझा बलात्कार केला. माझी जिंदगी बरबाद केली. लहानपणापासून त्यांनी माझा बलात्कार केला. माझी तुम्हाला सांगायची एवढी हिंमत नव्हती. मला चारित्र्यावर कलंक लावून घ्यायचा नव्हता. मला माफ करा. माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. गण्या व नील्या भाऊ म्हणायच्या लायकीचे नाहीत. त्यांनी माझी जिंदगी खराब केली. माझ्या भावानेच माझा घात केला. सगळ्यात जास्त पाप गण्याने केलंय, त्याच्या बायकोचं ही पाप केलंय. हे तुम्हाला माहीत झालं असतं तर महाभारत घडलं असतं. हे सर्व लोकांना माहीत झालं असतं तर लोक तुम्हाले बोलले असते. मी जशी तडपून -तडपून मेले तसे तेही मरतील. माझ्या शांत स्वभावाने माझा घात झाला… असा अंगावर शहारे आणणारा तरुणीने चिठ्ठीत लिहिला आहे. तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड, सहायक पोलीस निरिक्षक सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ बावस्कर, पोहेकाँ संदीप पाटील करत आहेत.