गण्या, नील्याला २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एवढी मोठी घटना घडूनही आरोपी काही घडलेच नसल्याच्‍या आविर्भावात!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांद्रा कोळी येथील निर्भयाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या नील्या (नीलेश एकनाथ मिसाळ) आणि गण्या (गणेश सुरेश काळवाघे) या दोघांना पोलिसांनी काल, २३ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अटक केली. आज, २४ सप्टेंबर रोजी दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नांद्रा कोळी येथील निर्भयाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या …
 
गण्या, नील्याला २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एवढी मोठी घटना घडूनही आरोपी काही घडलेच नसल्याच्‍या आविर्भावात!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांद्रा कोळी येथील निर्भयाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या नील्या (नीलेश एकनाथ मिसाळ) आणि गण्या (गणेश सुरेश काळवाघे) या दोघांना पोलिसांनी काल, २३ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अटक केली. आज, २४ सप्टेंबर रोजी दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नांद्रा कोळी येथील निर्भयाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नील्या आणि गण्या मरणाला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. चिठ्ठी सापडल्याची माहिती मिळताच गावात आरोपींविरोधात संतापाच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्रीच नांद्रा कोळी गाठून आरोपींना गजाआड केले.

एवढी मोठी घटना घडूनही नील्या आणि गण्या मात्र काही घडलेच नाही अशा अविर्भावात वागत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. प्रकरणाचा तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरीश ताथोड, सहायक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ बावस्कर व पोहेकाँ संदीप पाटील करीत आहेत.