गतिमंद तरुणीवरील बलात्‍काराने जिल्हा हादरला! अमडापूरमध्ये घरात घुसून दोघांनी केला आळीपाळीने बलात्‍कार!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुंबई, पुण्यातील बलात्काराच्या घटनांनी राज्यभर रोष व्यक्त होत असताना बुलडाणा जिल्ह्यातील गतिमंद तरुणीवरील बलात्काराच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. घरात एकटी पाहून दोघांनी १९ वर्षीय गतिमंद तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना १५ सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास चिखली तालुक्यातील अमडापूर येथे घडली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला …
 
गतिमंद तरुणीवरील बलात्‍काराने जिल्हा हादरला! अमडापूरमध्ये घरात घुसून दोघांनी केला आळीपाळीने बलात्‍कार!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुंबई, पुण्यातील बलात्‍काराच्‍या घटनांनी राज्‍यभर रोष व्‍यक्‍त होत असताना बुलडाणा जिल्ह्यातील गतिमंद तरुणीवरील बलात्‍काराच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. घरात एकटी पाहून दोघांनी १९ वर्षीय गतिमंद तरुणीवर आळीपाळीने बलात्‍कार केला. ही घटना १५ सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास चिखली तालुक्यातील अमडापूर येथे घडली. पीडितेच्‍या आईच्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्‍हा दाखल केला आहे.

शेख इलियास शेख सत्तार (५७) व चांद खाँ रहीम खाँ (५५, दोघे रा. अमडापूर) अशी आरोपींची नावे आहेत. अमडापूर येथील ४६ वर्षीय महिला नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेली होती. तिची १९ वर्षीय गतिमंद मुलगी घरीच होती. गावातीलच शेख इलियास आणि चांद खाँ हे मुलगी एकटीच असल्याचे पाहून घरात घुसले. दोघांनी तिच्‍यावर बळजबरीने व आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. पीडितेची आई शेतातून घरी आली असता दोघांनी तेथून पळ काढला. घडलेला प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितला. तपास ठाणेदार नागेश चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रवीण सोनवणे करत आहेत.