गतिमंद व्यक्तीचा खदानीत बुडून मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गतिमंद व्यक्तीचा खदानीत बुडून मृत्यू झाला. ही घटना काल, १६ ऑगस्टला रात्री ९ वाजता शेलोडी (ता. खामगाव) येथे उघडकीस आली. प्रल्हाद रामनाथ काळदातीर (४०, रा. शेलोडी ता. खामगाव) हे घरातून दोन दिवसांपासून बेपत्ता होते. घरचे व नातेवाइक त्यांचा शोध घेत होते. काल रात्री ९ च्या सुमारास शेलोडी येथील गिट्टी खदानातील …
 
गतिमंद व्यक्तीचा खदानीत बुडून मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गतिमंद व्यक्तीचा खदानीत बुडून मृत्यू झाला. ही घटना काल, १६ ऑगस्टला रात्री ९ वाजता शेलोडी (ता. खामगाव) येथे उघडकीस आली.

प्रल्हाद रामनाथ काळदातीर (४०, रा. शेलोडी ता. खामगाव) हे घरातून दोन दिवसांपासून बेपत्ता होते. घरचे व नातेवाइक त्यांचा शोध घेत होते. काल रात्री ९ च्या सुमारास शेलोडी येथील गिट्टी खदानातील पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. तेथील कामगारांनी ही माहिती खामगाव ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगावच्‍या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. प्रल्हाद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. हा अपघात आहे की आत्महत्या हे कळू शकले नाही. तपास खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोहेकाँ देवराव धांडे करत आहेत.